पोस्ट्स

DDLJ ची जादू - ३० वर्षानंतरही

इमेज
 DDLJ ची जादू - ३० वर्षांनंतरही ! आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ' दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ' DDLJ ला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आता मागे वळून पाहताना या सिनेमाची जादू नव्याने जाणवली. या सिनेमातल्या राज आणि सिमरन बरोबरच तारुण्यातून प्रौढत्वाकडे झुकलेल्या आमच्या पिढीने का बरं हा सिनेमा इतका डोक्यावर घेतला ? ह्या सिनेमाने चकचकीत locations, उत्कृष्ट अभिनय, indo western fusion मध्ये उलगडत जाणारी आवडेलशी (पटेलशी नाही) परिकथा समोर मांडली. अतिशय बांधीव कथा, तगडा अभिनय, योग्य दिग्दर्शन आणि त्याला मनात रेंगाळणाऱ्या सुंदर गाण्यांची जोड मिळाल्यावर, प्रेमकथा आवडणारे प्रेक्षक काही तास तरी ही जादू अनुभवायला गर्दी करू लागले. प्रेमकथा कितीतरी आल्या, गेल्या, हिट झाल्या, पण प्रत्येकाचे असे 30 वर्षे पूर्ण होण्याचे सोहळे किंवा आठवण सुद्धा निघत नाही, त्यातच DDLJ चे वेगळेपण आहे.  DDLJ परत प्रेमावर विश्वास ठेवायला भाग पाडतो (जरी DDLJ ची धुंदी उतरल्यावर हे फसवे आहे हे जाणवले तरीही). "मेरे ख्वाबोमें जो आये" म्हणणाऱ्या काजोलबरोबर आपल्यापैकी कितीतरी जणींनी ठेका धरला होता ना! प्रेमात प...

मला आवडलेली पुस्तकं:

इमेज
माझे बालपणीचे साथीदार © गीता पलुस्कर सप्टेंबर 10, 2007 ( माझ्या एका जुन्या ब्लॉग वरील ही २००७ ची पोस्ट इथे परत पोस्ट करत आहे. )      वाचनाचा छंद तसा लहानपणापासून आहे. वाचताही येत नव्हतं त्या वयापासून माझ्याकडे माझी पुस्तकं होती. माझी अंकलिपी मला अजून लक्षात आहे. ‘आरूणि आणि ईतर गोष्टी’ मधल्या सर्व गोष्टी वाचता येत नसतानाही आईकडून ऐकून पाठ झाल्या होत्या. चांदोबातली चित्रं , श्रावणातल्या कहाण्यांच्या संग्रहातली चित्रं अश्या चित्रमय पुस्तकांतून आईचं बोट धरून माझा वाचनप्रयत्न सुरू झाला . श्रावणातल्या कहाण्या म्हणजे चित्रविचित्र गोष्टींचा जणू खजिनाच. अजूनही श्रावणात लहान होवून आईच्या कहाण्या ऐकाव्यात असं वाटतं.       माझ्या शाळेत , म्हणजे बालमोहन विद्यामन्दीरमध्ये , बक्षिस म्हणजे पुस्तके द्यायचीच पद्धत होती. वार्षिक परिक्षेमध्ये प्रत्येक तुकडीतल्या पहिल्या दहा नंबरांना , प्रत्येक विषयातल्या हाय्येस्ट मार्क मिळवणार्या मुलांना , अशी भरपूर बक्षिसांची रेलचेल असे. पण बक्षिसं म्हणजे कुपन्स असत. कुपन घेउन आयडियल बुक डेपोमध्ये जायचं आणि मनासारखी पुस्त...

तारे जमीं पर

इमेज
   तारे जमीं पर © गीता पलुस्कर नुकताच एक  सुंदर चित्रपट बघण्या चा  योग आ ला,   तारे जमीं पर.  एरवी सिनेमा जुना झाल्याशिवाय मी बघत नाही.अतीप्रसिद्धीमुळे थियेटरवर उडणारी गर्दी, ते मल्टिप्लेक्सचे अव्वाच्या सव्वा दर हे सगळं टाळायचं असेल तर काही आठवडे वाट पहाणं अधिक बरं वाटतं. काही परीक्षणं वाचली, कुणाच्या तोंडून प्रशंसा ऐकली तरच मी चित्रपट बघण्याचं धाडस करते. पुन्हा तो मल्टिप्लेक्समध्ये पाहीला आणि वाईट निघाला तर फारंच पैसे फुकट गेल्याची हळहळ येते, त्यापेक्षा वाट पाहीलेली बरी.परंतू माझेच हे सर्व नियम तोडून मी हे दोन्ही चित्रपट रीलीज झाल्याबरोबर लगेच पाहीले. कारण पूर्वप्रसिद्धीने भितीवर मात केली.          तारे जमीं पर  हा अमीर खानचा असल्यामुळे तो बघण्याची मला उत्सुकता होतीच. तो मतीमन्द मुलांबद्दल आहे असं वाटलं होतं; पण प्रत्यक्षात तो अगदी वेगळा आढळून आला. डिस्लेक्षिया ह्या मुलांमध्ये आढळून येणा ऱ्या  समस्येबद्दल किंवा लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल हा सिनेमा  भाष्य  करतो. अनेक वर्ष शिक्षणक्षेत्रात काढूनसुद्धा डिस्...