पोस्ट्स

2008 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तारे जमीं पर

इमेज
   तारे जमीं पर © गीता पलुस्कर नुकताच एक  सुंदर चित्रपट बघण्या चा  योग आ ला,   तारे जमीं पर.  एरवी सिनेमा जुना झाल्याशिवाय मी बघत नाही.अतीप्रसिद्धीमुळे थियेटरवर उडणारी गर्दी, ते मल्टिप्लेक्सचे अव्वाच्या सव्वा दर हे सगळं टाळायचं असेल तर काही आठवडे वाट पहाणं अधिक बरं वाटतं. काही परीक्षणं वाचली, कुणाच्या तोंडून प्रशंसा ऐकली तरच मी चित्रपट बघण्याचं धाडस करते. पुन्हा तो मल्टिप्लेक्समध्ये पाहीला आणि वाईट निघाला तर फारंच पैसे फुकट गेल्याची हळहळ येते, त्यापेक्षा वाट पाहीलेली बरी.परंतू माझेच हे सर्व नियम तोडून मी हे दोन्ही चित्रपट रीलीज झाल्याबरोबर लगेच पाहीले. कारण पूर्वप्रसिद्धीने भितीवर मात केली.          तारे जमीं पर  हा अमीर खानचा असल्यामुळे तो बघण्याची मला उत्सुकता होतीच. तो मतीमन्द मुलांबद्दल आहे असं वाटलं होतं; पण प्रत्यक्षात तो अगदी वेगळा आढळून आला. डिस्लेक्षिया ह्या मुलांमध्ये आढळून येणा ऱ्या  समस्येबद्दल किंवा लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल हा सिनेमा  भाष्य  करतो. अनेक वर्ष शिक्षणक्षेत्रात काढूनसुद्धा डिस्...